fbpx

मी भारतीय असून माझा जन्म भारतातच : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लल कुमार देव

Viplal Kumar Dev

आगरतळा : सध्या सोशल मिडीयावर त्रिपुराचे भाजप मुख्यमंत्री विप्लल देव चांगलेच चर्चेत आहे. विप्लल देव यांना त्यांच्या जन्म स्थळावरून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. मी भारतीय असून माझा जन्म भारतातला आहे असं म्हण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विप्लल देव यांच्या विकिपीडिया पेजवर गेल्या तीन दिवसात ३७ वेळा बदल करण्यात आला. त्यामुळे हा वाद आणखीन वाढत चालला आहे. विप्लल देव यांचा जन्म बंग्लादेशाचा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्व भूमिवर विकिपिडीयावर सातत्याने बदल झाले आहे.

३० जुलैला आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) अंतिम मसुदा लागू करण्यात आला, त्यामुळे राज्यातील सुमारे ४० लाख लोकांची नावं नसल्यामुळे आसाममध्ये नागरिकत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी लोकसभेत व राज्यसभेत अमित शहा आणि ममता बॅनर्जी यांच्यात एनआरसी वरून चांगलीच जुंपली आहे.

गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांमध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लल कुमार देव याचं विकिपीडिया पेज मध्ये ३७ वेळा बदल करण्यात आला. देव याचं जन्म ठिकाण त्रिपुरातील गोमती जिल्ह्याऐवजी बांग्लादेशच्या चांदपूर जिल्ह्यात असल्याची माहिती विकिपिडीयावर देण्यात येत आहे. विकिपिडीयावर विप्लल देव याचं नावावरून चाललेल्या वादामुळे विरोधकांना चांगलीच संधी चालून आली आहे. आता भाजपच्या त्रिपुरा मुख्यमंत्र्यांवर नागरिकत्वाच्या मुद्यावरून गदारोळ पाहण्यास मिळत आहे.