मी बाबासाहेब आंबेडकरांचा शिष्य, माझ्यावर त्यांचेच संस्कार  : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी आहे. घराणेशाही ही लोकशाहीची सर्वात मोठी शत्रू आहे, असं त्यांचं मत होतं. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी हे वक्तव्य केले.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. यंदाच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड समर्थन मिळत आहे. जनतेनेचंं आमची प्रत्येक घोषणा तयार केली आहे. आम्हाला एकही घोषणा तयार करावी लागली नाही. भाजला मिळणारा पाठिंबा वाढत आहे आणि एनडीए मधील मित्रपक्षांचा पाठिंबाही वाढतो आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले. मात्र विरोधकांकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून सुरु आहे. परंतु ते त्यांचीच प्रतिमा मलीन करत आहेत. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर मला कॉंग्रेसची दया येते. असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच, विरोधकांकडे कुठलेही मुद्दे राहिले नाहीत. केवळ मोदी हटाओ हा एकाच त्यांचा मुद्दा आहे आणि तोच त्यांचा अजेंडा आहे. विरोधकांकडून व्होट बँकेचे जे राजकारण सुरु आहे ते मुस्लिमांना भीती दाखवणारे राजकारण आहे. माझा सबका साथ, सबका विकास हाच मंत्र आहे. तर सबका साथ, सबका विकास हेच माझं राजकारण आहे. देश हाच माझा परिवार आहे. माझं कोणतेही वेगळं कुटुंब नाही. प्रत्येक गरीबाची जात ही माझी आहे आणि मी त्या जातीचा आहे. त्यांचं दु:ख हे माझं दु:ख आहे. असेही त्यांनी म्हंटले. तसेच  मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी आहे. घराणेशाही ही लोकशाहीची सर्वात मोठी शत्रू आहे, असं त्यांचं मत होतं. माझ्यावर त्यांचेच संस्कार आहेत. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसाचारावरही भाष्य केले. विरोधी पक्ष पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर का शांत आहे? असा सवालही त्यांनी केला. तसेच पश्चिम बंगालमधील यंदाची निवडणूक  ही जनता विरुद्ध तृणमूल आणि तृणमूलचे गुंड अशी आहे. असेही त्यांनी म्हंटले.Loading…


Loading…

Loading...