Share

Hyundai Creta Facelift | ‘या’ बदलांसह एप्रिल 2023 पर्यंत लाँच होऊ शकते Hyundai Creta Facelift

Hyundai Creta Facelift | टीम महाराष्ट्र देशा: ह्युंडाई (Hyundai) ने मार्च 2020 मध्ये सेकंड जनरेशन क्रेटा एसयुव्ही (Creta SUV) लाँच केली होती. त्यानंतर या एसयूव्हीने बाजारामध्ये आपली पकड मजबूत ठेवली आहे. ह्युंडाईची ही एसयूव्ही भारतामध्ये सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. अशा परिस्थितीत कंपनीने या एसयूव्हीचे नाईट एडिशन सादर केले आहे.

ऑटो एक्सपो 2023 मध्ये ह्युंडाई आपले अपडेटेड क्रेटा व्हर्जन सादर करू शकते. या नवीन एसयूव्हीमध्ये पॅरामेट्रिक फ्रंट ग्रिल आणि एलईडी डीआरएल फिन शेप एलिमेंट मिळू शकते. त्याचबरोबर यामध्ये बुमेरांग आकाराचे LED टेललाइट्स आणि नवीन डिझाइन केलेले 17-इंच अलॉय व्हील असू शकते.

इंटिरियर

या नवीन एसयूव्हीचा इंटिरियरबद्दल बोलायचे झाले, तर याचा केबिनचा आउटलेट सध्याच्या मॉडेल सारखाच असेल. परंतु नवीन क्रेटामध्ये नवीन रंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर या कारमध्ये वायरलेस Apple CarPlay/Android Auto आणि Alcazar प्रमाणेच एक पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे.

फीचर्स

अपडेटेड क्रेटामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, रियर क्रॉस-ट्राफिक कोलिजन, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर इत्यादी आकर्षक फीचर्स मिळू शकतात.

इंजिन

ह्युंडाईची ही नवीन एसयूव्ही पॉवरट्रेन पर्यायसह बाजारात उपलब्ध होईल. ही एसयूव्ही 1.5L MPi पेट्रोल, 1.5L CRDi डिझेल आणि 1.4L टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे.

किंमत

नवीन क्रेटा सध्याच्या मॉडेलपेक्षा किमान 50,000 रुपयांनी अधिक महाग असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही कार बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर या गाड्यांसोबत स्पर्धा करेल.

महत्वाच्या बातम्या

 

Hyundai Creta Facelift | टीम महाराष्ट्र देशा: ह्युंडाई (Hyundai) ने मार्च 2020 मध्ये सेकंड जनरेशन क्रेटा एसयुव्ही (Creta SUV) लाँच …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now