हैद्राबाद एन्काऊंटर विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

टीम महाराष्ट्र देशा : हैद्राबाद येथे पोलिसांनी केलेल्या बलात्कारांच्या एन्काऊंटर विरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सीएस मणी आणि वकील प्रदीप कुमार यांनी पोलिसांच्या या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

२०१४ मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन या कारवाईदरम्यान करण्यात आले नसल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या कारवाईत सहभागील पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता असून संबंधित पोलिसांवर करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.

Loading...

तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे समाजातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केले आहे. या समर्थना विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोहरलाल शर्मा यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. माध्यमांवरही गॅग ऑर्डर चालवण्याची मागणी त्यांनी केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फतही याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा झाला आहे. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चारही आरोपींचा जागीच एन्काऊंटर केला आहे. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?