Share

IPL 2023 | “हैद्राबाद शहर माझ्यासाठी नेहमीच…” ; SRH सोडल्यानंतर केन विल्यमसनने केली भावनिक पोस्ट

टीम महाराष्ट्र देशा: IPL 2023 साठी मंगळवारी रिलीज आणि रिटेन खेळाडूंच्या याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही फ्रेंचाईजींनी आपल्या ठराविक खेळाडूंना संघात ठेवले आहे. तर, काही खेळाडूंना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनेक संघांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. तर आयपीएल मधील सर्वच संघांमध्ये कमी जास्त प्रमाणात बदल बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad SRH) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. SRH ने आपल्या संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Ken Williamson) याला कायम ठेवलेले नाही. सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनला करारमुक्त करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत नेणाऱ्या केन विल्यमसनने हैदराबादला सोडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सनरायझर्स हैदराबाद सोडल्यानंतर केन विल्यमसनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केले आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, “फ्रॅंचाईजी, टीममेट्स, स्टाफ आणि विशेषता ऑरेंज आर्मीचे मी खूप खूप आभार मानत आहे. तुम्ही सर्वांनी मिळून ही आठ वर्षे स्मरणीय बनवली आहे. त्याचबरोबर संघासोबत हैदराबाद शहर माझ्यासाठी नेहमी खास असेल, असे केन विल्यमसन म्हणाला आहे. त्याची ही भावनिक इंस्टाग्राम पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल लिलावामध्ये केन विल्यमसनची किंमत 14 कोटी रुपये होती. त्याने सनरायझर्स हैदराबाद कडून 76 सामने खेळले असून, 2101 धावा त्याच्या नावावर आहे. 126 च्या स्ट्राइक रेटने आणि 36 च्या सरासरी धावा केन विल्यमसनने या धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 46 सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले आहे.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2018 च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. केन विल्यमसनने या संघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले होते. मात्र त्याला कधी या स्पर्धेचे जेतेपद जिंकता आले नाही. मात्र, त्याने चाहत्यांच्या  मनावर नेहमी आपल्या अधिराज्य गाजवले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: IPL 2023 साठी मंगळवारी रिलीज आणि रिटेन खेळाडूंच्या याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही फ्रेंचाईजींनी आपल्या …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now