VIDEO- धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा मोह तरुणाला पडला महागात

हैदराबादमधील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा- धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला ट्रेनची जबरदस्त धडक बसली असून यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे.

bagdure

हा व्हिडिओ हैदराबादमधला असून संबधित तरुणाचं नाव शिव असल्याचे समजत आहे. काही स्थानिक वृत्तवाहिनींच्या माहितीनुसार ही घटना तीन दिवसांपूर्वी हैदराबादमधल्या भरतनगर स्थानकावर घडली. हा तरुण धावत्या ट्रेन समोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. तो रेल्वेरुळाच्या अगदी बाजूला होता, या तरुणाला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यापासून त्याच्या मित्रानं रोखलंदेखील पण, या तरुणानं त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे सेल्फीच्या नादापायी मागून वेगानं येणाऱ्या ट्रेनची धडक त्या तरूणाला बसली. यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

You might also like
Comments
Loading...