fbpx

Aurangabad Violence : दंगलीत सहभागी असलेल्या चंद्रकांत खैरे यांना अटक करा -दलवाई

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये मागील आठवड्यात झालेल्या दंगलीमध्ये दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता . शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात मोठ्या प्रमाणत वित्तहानी झाली होती. तसेच या घटनेत २ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर २५ जण जखमी झाले होते.

दरम्यान औरंगाबादची दंगल ही पोलिसांच्या मदतीने घडवून आणल्याचा दावा हुसेन दलवाई यांनी केला आहे. पोलिसांच्या मदतीने ठरवून केलेला एकतर्फी हल्ला असे औरंगाबादच्या दंगलीचे वर्णन करावे लागेल. या हिंसाचारामध्ये जे नेते सहभागी होते, त्यांच्यावर तातडीने कारवाई करायला हवी. त्यात विद्यमान शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा देखील समावेश असावा, अशी मागणी देखील हुसेन दलवाई यांनी यावेळी केली आहे.

बुधवारी त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. पोलीस गोळीबारात मृत्यू झालेल्या हारिस कादरी याच्या घरी जाऊन पडताळणी करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचे सांगत दलवाई यांनी पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.