भाजपचे सरकार जुल्मी – हुसेन दलवाई

जनता राहुल गांधींकडे आश्‍वासक नेतृत्व म्हणून पाहत आहे- दलवाई

रत्नागिरी : भाजपचे सरकार म्हणजे हुकुमशाही नव्हे तर जुल्मी सरकार आहे. गोरगरिबांचे शोषण करून श्रीमतांची घरे भरणारे हे सरकार असून  निवडणुकीच्या काळात दंगली घडविणे, दलित आणि अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करून निवडणुका जिंकणे हे मोदींचे सूत्र आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

महाड येथे काँग्रेसतर्फे भाजप सरकारच्या विरोधात ४ नोव्हेंबरला आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी करण्यासाठी दलवाई यांनी आज चिपळूण येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दलवाई म्हणाले, देशात जीएसटी कायदा लागू झाला. तीन महिन्यांनंतर लोकांना परतावा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारकडून ६५ हजार कोटी रुपये जनतेला देणे आहे. सरकारकडे पैसे नसल्यामुळे हा परतावा देणे शक्य होत नाही. सत्तेत येण्यापूर्वी २ कोटी लोकांना रोजगार देण्याची हमी मोदींनी दिली होती. प्रत्यक्षात केवळ नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जय शाह यांच्याच हाताला काम मिळाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मोदी आणि भाजपवाल्यांनी तीन वर्षे अतिशय खालच्या पातळीवर टिंगलटवाळी केली. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज जनता राहुल गांधींकडे आश्‍वासक नेतृत्व म्हणून पाहत आहे असे दलवाई यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...