fbpx

पुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं

टीम महाराष्ट्र देशा : वटपोर्णिमा सणाच्या एक दिवस आधी पत्नीपीडित पतींनी अनोखी वटपोर्णिमा साजरी केली आहे. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुढच्या जन्मी, अशी पत्नी नको अशी मागणी पत्नीपीडित पतींनी केली आहे.

१६ जून रविवारी वटपोर्णिमा हा सन आहे. या सणाच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पुजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करते. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. परंतु वटपोर्णिमा सणाच्या एक दिवस आधी पत्नीपीडित पतींनी अनोखी वटपोर्णिमा साजरी केल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत असते. याचदरम्यान, औरंगाबाद शहरातील पत्नीपीडित पतींनी वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुढच्या जन्मी, अशी पत्नी नको, अशी मनोकामना यमराजाकडे केली आहे. त्याच्च्या या आंदोलनाची चर्चा संपूर्ण महाराष्टार्त होत आहे.