पती पत्नी और वो… रितेश जेनेलियाचा व्हिडिओ व्हायरल

रितेश

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख याचा राजकीय वारसा असून सुद्धा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमावले आहे. सोशल मिडियावर बराच सक्रिय असलेल्या रितेश इन्स्टाग्राम आपले अनेक व्हिडिओ शेअर करत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांची न केवळ मनं जिंकली तर त्यांचे छान मनोरंजनही केले.

रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुखची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘पुट यॉर हॅन्ड्स ऑन माय शोल्डर’ हे गाणं सुरु आहे. जेनेलिया उठल्यानंतर रितेशच्या लक्षात येतं की जेनेलिया तर इथे नाही मग हा हात कोणाचा तर तो हात दिग्दर्शक मिलाप झवेरीचा असतो. मिलाप त्या दोघांच्या मागे लपलेला होता. त्यांचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेश आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप धमाल करतो. आपल्या मुलांसह, पत्नी, मुलं आणि कुटूंबासह छान वेळ घालवताना दिसतो. त्या संदर्भातील व्हिडिओ देखील तो सोशल मिडियावर शेअर करत असतो.

महत्त्वाच्या बातम्या

IMP