चायनीज पदार्थ खाण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या

wife murder at baramati

बारामती –  चायनीज पदार्थ खाण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. कामावरून घरी परतल्यावर पत्नीने स्वयंपाक केला नाही तसेच आणलेले चायनीज पदार्थ खाल्ले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं आहे .

मीना जावेद पठाण असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती जावेद पठाण (मूळ रा. उत्तर प्रदेश) याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री स्वयंपाक न केल्याने पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.या वादानंतर पतीने चायनीज पदार्थ आणले. पत्नीने ते खाण्यास नकार दिल्याने जावेदने तिचा गळा दाबून खून केला.