पत्नीची हत्या करून पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर

crime

कौटुंबिक वादाच्या कारणातून पतीनेच गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर घराला कुलूप लावूण पती स्वत पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

माधुरी आकाश चव्हाण (वय 22, ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती आकाश चव्हाण याला अटक केली आहे. मंगळवारी पहाटे फुरसुंगी भागातील गंगानगर परिसरात ही घटना घडली. झोपेत असलेल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

हत्येनंतर आरोपी आकाशने घराला कुलूप लावलं. आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला आई-वडिलांच्या घरी सोडून पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.