fbpx

मोदींच्या रॅलीत सहभाग घेतल्याने तलाक

टीम महाराष्ट्र देशा – केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनामध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यासाठी प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असतानाच उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभाग घेतल्याने एका महिलेला तिच्या पतीने तलाक दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. फायरा असे या महिलेचे नाव असून दानिश तिच्या पतीचं नाव आहे.याविरोधात महिलेने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण फरहत नकवी यांच्याकडे मदतीची याचना केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.

नुकतीच फरहत नकवी यांनी बरेलीमध्ये एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यात फायराही होती. यावरून दोघांत वाद झाला. चिडलेल्या पतीने फायरा व मुलाला जोरदार मारहाण केली. त्यानंतर तीन वेळा तलाक म्हणत तिच्याशी काडीमोड घेतला व तिला आणि मुलाला घराबाहेर काढलं.

दीड वर्षांपूर्वी फायरा आणि दानिशचा निकाह झाला होता. त्यांना एक मुलगाही झाला. पण काही दिवसांपू्र्वी दानिशचे त्याच्या मामीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे फायराला कळले आणि तिला धक्का बसला. यावरून त्यांच्यात वादही झाला. तेव्हापासून त्यांच्यात रोजच खटके उडू लागले. त्यातच फायराने मोदींच्या रॅलीत सहभाग घेतल्याने दानिशला आयतेच कोलीत मिळाले. त्याने त्याच मुद्द्यावरून तिला तलाक दिला.

1 Comment

Click here to post a comment