पतीनेच अनेकवेळा त्यांच्या मित्रांना माझ्यावर बलात्कार करायला लावला

Gang-rape

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात गाजत असलेल्या हापूड गँगरेप प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. पतीने अनेकवेळा त्यांच्या मित्रांना माझ्यावर बलात्कार करायला लावला असा गंभीर आरोप या पिडीत महिलेले केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पीडित महिलेने स्वतःला पेटवून घेतलं असून, तिच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडित महिला ही ८० टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.आता या सगळ्या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, १४ जणांविरुद्ध हापूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना दिलेल्या जबाबात पिडीतेने आपली व्यथा मांडली आहे. ‘आता माझे सगळे शरीर जळाले आहेत. त्यामुळे कोणीही माझ्यावर बलात्कार करायला येणार नाही,’ असे तिने म्हटले आहे. यावेळी आपल्या अश्रूंना कसे तरी रोखण्याचा प्रयत्न करत पीडित महिला म्हणाली की, ‘जगात कोणत्याही महिलेवर अशी वेळ ओढवली जाऊ नये’.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, २००९मध्ये पीडित महिलेच्या वडिलांनी तिचा विवाह एका वृद्ध माणसाशी केला होता. त्यावेळी संबंधित महिलेचे वय १४ वर्षे होते. काही दिवसांतच त्या वृद्ध पतीचे निधन झाले आणि त्या महिलेवर संकटे येऊ लागली.पतीच्या मृत्यूनंतर वडिलांनी दहा हजार रुपये घेऊन माझा दुसरा विवाह करून दिला. दहा हजार रुपयात माझी विक्री केल्याचाच तो प्रकार होता. त्या दुसऱ्या पतीने अनेकवेळा त्यांच्या मित्रांकडून माझ्यावर बलात्कार करायला लावला. माझ्यावर अनेकांनी बलात्कार केल्याचे अनेकांना माहिती झाले होते. त्यामुळे त्यांनी माझा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली होती.’ असेही पिडीत महिलेने म्हंटले.