औरंगाबाद : पैठण तालुक्यातील खंडाळा येथील तरुणाच्या पत्नीचे सासरच्या मंडळीने बळजबरीने दुसर्याशी विवाह लावला. या नैराश्यातून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली.
पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील पारधी समाजातील मुकेश रेहमान चव्हाण (वय 25 रा. खंडाळा ता. पैठण ह. मु. एरंडगाव ता.शेवगाव) याचा काही वर्षापुर्वी एरंडगाव येथील मुलीशी विवाह झाला होता. नात्यातीलच मुलगी असल्यामुळे मुकेश घरजावई म्हणून राहत होता. परंतू पतीपत्नीमध्ये सतत वाद होत होता. त्यामुळे मुलीच्या कुटूंबियांनी तिचा विवाह दुसर्या तरुणासोबत लावून दिला.
या नैराश्यातून मुकेशने मंगळवारी आपल्यागावी जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली.
विहमांडवा पोलीस चौकीचे जमादार संजय मदने यांनी पंचनामा करून सदरील घटनेची नोंद पोलिस ठाण्यात केली. मयत युवकाच्या अंत्यविधी प्रसंगी कुठलाही वाद विवाद होऊ नाही म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही आहोत आंबेडकरवादी, लागू नका आमच्या नादी..सर करायची आहे आम्हाला मुंबईची गादी’
- मलिंगा, पॅटिन्सनसह मुंबई इंडियन्सने ‘या’ ७ खेळाडूंना दिला डच्चू !
- या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल; भाजप नेत्याची बोचरी टीका
- सलाम : दुर्घटनेत पत्नी गमावली, स्वतः जबर जखमी झाले मात्र रुग्णालयातही श्रीपाद नाईक ‘ऑन ड्युटी’
- ‘पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील’