पतीचा पत्नीवर चाकू हल्ला

पिंपरी-चिंचवड : पतीने पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरी – चिंचवड मध्ये घडली आहे. आणि विशेष म्हणजे हा सर्व प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे . या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिरोज अली शेख (वय ३०) आणि फरहान शेख (वय २६) हे पती-पत्नी पिंपरी-चिंचवडमधील अजमेर वसाहतीत राहतात. काल ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने फिरोजने पत्नीला मोशी येथील मोकळ्या मैदानात नेले आणि तिच्यावर चाकूने हल्ला चढवला. मात्र, पत्नीने आरडाओरडा केल्याने मैदानाशेजारील नागरिकांनी धाव घेतली. दरम्यान, फिरोजने फरहानच्या गळ्याला चाकू लावला होता. तसेच तिच्या पोटातही चाकूने हल्ला केला. हा सर्व प्रकार बघ्याची भुमिका घेणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान, वेळीच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी फरहानवर ताबा मिळवला.
या घटनेमुळे पत्नी घाबरलेली होती. फरहान याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा हल्ला चारित्र्याच्या संशयावरून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या घटनेचा विडिओ सोशियल मीडियावर व्हायरल झाला आहे. फरहान आणि फिरोज यांना तीन मुले असून त्यांचा विवाह हा दहा वर्षांपूर्वी झाला होता.

पहा या खळबळजनक हल्याचा व्हिडीओ