fbpx

पुण्यात खळबळजनक घटना! पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून पत्नीवर कोयत्याने वार

crime

टीम महाराष्ट्र देशा : दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक धक्कादायक कृत्य घडले.  युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास सॅलीस्बरी पार्क येथे घडला.  या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पतीला अटक केली असून  जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नरगीस आसिफ नायब (वय. ४५ वर्षे, रा. सलीस्बरी पार्क) असे जखमी महिलेचे नाव आहे. आसिफ नायब (वय. ५० वर्षे, रा. सॅलीस्बरी पार्क) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.आसिफ नायब यांचा होर्डींग लावण्याचा व्यवसाय आहे. तर नरगीस या गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते सॅलीस्बरी पार्क येथे राहण्यास आहेत.

दरम्यान सोमवारी आसिफ टि. व्ही. पाहात होते. त्यावेळी नरगीस बेडरुममध्ये जाऊन मोबाईलवर युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहात होती. तेवढ्यात आसिफ तेथे आले. त्यांनी हातात कोयता घेऊन नरगीसला कोयता दाखवून पाकिस्तानी ड्रामा पाहू नकोस असं सांगितलं तरी तू पाहतेस. कालही माझ्याशी भांडण केले. असं म्हणत नरगीसच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यांनी ते वार अडविण्यासाठी हात पुढे केला. तर हाताची अंगठा तुटून खाली पडला. त्यानंतर नरगीस यांनी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारच्या लोकांनी येऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उसगावकर करत आहेत.