पत्नीला जीन्स घालायला विरोध, पतीवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबई मध्ये एक अजब घटना घडली आहे चक्क जीन्स घालण्यासाठी विरोध केल्यामुळे पत्नीने पतीवर कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली आहे . या तक्रारीनंतर पतीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

त्याच झाल अस की, विरारमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याचा 2016 मध्ये विवाह झाला होता. फेब्रुवारी 2017 साली पत्नीने पतीकडून छळ होत असल्याची तक्रार केली. लग्नानंतर पतीने जीन्स घालण्यावर बंदी घातली. सातच्या आत घरात यायचं असा नियम बनवला. खाण्यावरही बंधनं आणली, अशी तक्रार पत्नीने केली होती.

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर भा.दं.वि 498 A या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...