राणेंच्या जाण्याने कॉंग्रेसला फारसा फरक पडणार नाही;हुसेन दलवाई

narayan rane

सावंतवाडी येथे झालेल्या कॉंग्रेसच्या आढावा बैठकीला नारायण राणे यांना का बोलावलं नाही असा सवाल उपस्थित करत आ.नितेश राणे यांनी वरिष्ठ नेत्यांचा चांगलाच अपमान केला होता . त्याचे साईड इफेक्ट आता दिसू लागले आहेत . राणेंच्या जाण्याने कॉंग्रेसला फारसा फरक पडणार नसल्याचं कॉंग्रेसचे जेष्ठ नेते खासदार हुसेन दलवाई यांनी स्पष्ट केल आहे. राणेंबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त निष्ठावान कार्यकर्ते आमच्याकडे आहेत असा टोला दलवाई यांनी राणेंना लगावला आहे .

सावंतवाडी येथे झालेल्या कॉंग्रेसच्या आढावा बैठकीला नारायण राणे यांना का बोलावलं नाही असा सवाल उपस्थित करत कॉंग्रेस चे जेष्ठ नेते हुसेन दलवाई यांच्यासह दिग्गज नेत्यांना आमदार नितेश राणे यांनी चांगलच धारेवर धरलं होत . एकीकडे काँग्रेसची वाताहत झालेली असताना केवळ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिंकून राणे साहेबांनी काँग्रेसची शान राखली. मात्र, त्यांनाच डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कधीच खपवून घेतले जाणार नाहीअसा सज्जड दम नितेश राणे यांनी दिला होता . राणेंना विश्वासात न घेता आढावा बैठक कशी काय घेतली जाते, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला होता .

आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दलवाई यांनी राणे पिता पुत्रांवर पलटवार केला .राणेंबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त निष्ठावान कार्यकर्ते आमच्याकडे आहेत असा टोला दलवाई यांनी राणेंना लगावला आहे .याचबरोबर राणेंना मोठा सन्मान कॉंग्रेस दिला याची देखील आठवण त्यांनी करून दिली भाजपमध्ये राणेंना सन्मान मिळेल की नाही याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केला. शिवाय राणेंच्या जाण्याने कॉंग्रेसला फारसा फरक पडणार नसल्याचं देखील दलवाई यांनी स्पष्ट केल आहे .

 

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...