औरंगाबादकरांनो त्वरा करा; आता ग्रीन झोनमधील मालमत्ताही होणार नियमित!

AMC

औरंगाबाद : जुने शहर व शहराच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा (डीपी प्लान) तयार करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जो भाग सध्या डीपी प्लॅनमध्ये किंवा रस्त्यासाठी आरक्षित नाही, मात्र ग्रीनझोनमध्ये आहे, अशा जागा किंवा मालमत्तासुद्धा यापुढे गुंठेवारी अंतर्गत नियमित केल्या जाणार आहेत. तथापि, पहिल्या टप्यात मालमत्ता नियमित करण्याची मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंत होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळल्याने महापालिकेने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवली आहे.

आजवर १ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान एकूण ४७७ मालमत्ता नियमित झाल्या असून यातून सुमारे साडेचार कोटींचा महसूल पालिकेला मिळाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार औरंगाबाद पालिकेने गुंठेवारी सुधारीत अधिनियम २०२१ नुसार शहरातील गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमितीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

मागील १९ वर्षात गुंठेवारीतील सात हजार मालमत्ता नियमीत झाल्या आहेत. त्यातून ६ कोटी १२ लाखांचा महसूल मिळाला होता. यावेळी मात्र रेडीरेकनर दराप्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यानुसार गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी शहरातीन नऊ प्रभाग कार्यालयात गुंठेवारीच्या संचिका जमा करण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. मागील १ ते ३० ऑक्टोबरदरम्यान पालिकेने १९३ मालमत्ता नियमीत केल्या. नागरिकांचा प्रतिसाद पाहता आता पालिकेने या मोहिमेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या