वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांना परभणीतून लाखो एसएमएस

परभणी : परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून परभणीकर खुप प्रयत्न करत आहेत. यासाठी परभणी संघर्ष समितीच्या वतीने जोरदार लढा देखील सुरू आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांना लाखो एसएमएस पाठवले आहेत. लढ्याला अंतिम स्वरूप आले आहे. आता मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.

यासाठी परभणीकरांनी ‘कोरोना’ ची पार्श्वभूमी लक्षात घेता कुठलाही जमाव न जमवता तसेच आंदोलन न करता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या मोबाईलमध्ये आपले ‘एसएमएस’ पाठवून परभणीकरांच्या भावना मोठ्या प्रमाणात कळवल्या आहेत.त्या नुसार होण्याऱ्या अधिवेशनाच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ठराव पास करण्याचा आग्रह परभणीकरांच्या वतीने केला आहे.

या आंदोलनात खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, सरचिटणीस रामेश्वर शिंदे, उदय देशमुख, सुर्यकांत हाके, बळवंत खळीकर, राजू शिंदे, नितीन लोहट, सुभाष जाधव, रामकिशन रौंदळे, भागवत रेंगे, पडघन आदींनी मंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना मोबाईलवर एसएमएस पाठवून आंदोलन केले आहे.

या एसएमएस आंदोलनाला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय झाल्यावर परभणी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळणार आहे. या माध्यमातून शहरासह जिल्हाच्या विकासाला चालणा देखील मिळणार असल्याचे महाराष्ट्र देशाशी बोलताना खासदार फौजिया खान तसेच माजी आमदार विजय गव्हाणे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :