क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.

पुणे : महाराष्ट्रात महिलांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज १८६ वी जयंती. १८व्या शतकात महाराष्ट्रात महिलांना शिक्षण मिळाव म्हणून त्यांचे विशेष योगदान होते. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी आजही ओळखले जाते.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम केले. महिलांना जर शिक्षित आणि सबल बनवायचे असेल तर महिलांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांनी पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे करत इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला.

१८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हा जीघेना आजार अनेकांचे जीव घेत होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. स्त्रियांनी शिकावे, अनाथांना आश्रय मिळवा म्हणून झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन.