अभिनेत्री हुमा कुरैशीला पण वीज बिलाचा झटका

huma kureshi

मुंबई : एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरणविरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि रेणुका शहाणे यांच्या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीला वीज बिलाचा फटका बसला आहे.

अभिनेत्री हुमा कुरैशीला पण वाढीव वीज बिलाचा फटका बसला आहे. नुकताच हुमाने ट्विट करत वीज बिलाची माहिती दिली आहे. ‘गेल्या महिन्यात मी मला सहा हजार रुपये वीज बिल भरले आणि आता या महिन्यात मला ५० हजार रुपये बिल?’ असे हुमाने ट्विटमध्ये म्हटले आहे. हुमाने पण अदानी वीज कंपनीला टॅगही केलं आहे.

यापूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीज बिल आल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांना २९,७०० रुपये आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वीज बिलाची जोरदार चर्चा सुरु आहे.

बापरे… ‘या’ अभिनेत्री तब्बल ३६ हजारांचं वीज बिल, ट्विट करत व्यक्त केला संताप

वीज दर कपातीच्या निर्णयामुळे उद्योग व व्यवसाय वृद्धीसाठी मोठा हातभार लागेल : नितीन राऊत

आनंदाची बातमी ! भारतात कोरोनाची पहिली लस तयार, मानवी चाचणीला दिली परवानगी