नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी भरलेल्या करातून माल काढला; भाजपचं टीकास्त्र

मुंबई : पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. याशिवाय कामावर निघालेल्या नोकरदारांना वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. नेहमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे वर्षानुवर्षे मुंबईत पावसाचं पाणी साठून जनजीवन विस्कळीत होत असतं.

दरम्यान, यंदा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महापालिकेने पावसाळीपूर्व कामांचे व अनेक प्रकल्पांचे काम सुरु केले होते. मात्र, दोन दिवसांच्या पावसाने या प्रकल्पांवर अक्षरशः ‘पाणी’ फेरले आहे. मुंबईची तुंबई झाल्याने भाजपने मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसह राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, ‘पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाजे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई,’ असा घणाघात राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP