पुणे : वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करत पुण्यातल्या कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या मोर्चामुळे आपल्या मनाला प्रचंड वंदना झाल्या असे म्हंटले आहे. वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी हटवल्यानंतर वसंत मोरे यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. वसंत मोरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक जण समोर येत आहेत.
कोंढव्यात मुस्लिम समाजाने वसंत मोरे यांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाने एक मोर्चा काढला होता. या मोर्च्यामध्ये “राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद” असे घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे आपल्या मनाला प्रचंड वेदना झाल्याचे दुःख वसंत मोरेंनी व्यक्त केली. “राज ठाकरे झिंदाबाद होते, राज ठाकरे झिंदाबाद राहणार” असे वसंत मोरे म्हणाले.
माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की, “माझा भाग मला शांत हवाय, त्यामुळे समाजात दुफळी निर्माण होईल, समाजात वादंग होईल असे वर्तन मुस्लिम समाजाकडून घडू नये.
महत्वाच्या बातम्या :