समाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना

टीम महाराष्ट्र देशा – टेंभू ता. कराड येथील समाजसुधारक (कै.) गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी मोडतोड करून नुकसान केल्याची घटना शुक्रवार, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद युवराज भीमराव भोईटे यांनी कराड तालुका पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टेंभू येथील आगरकर हायस्कूलच्या प्रांगणात आगरकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची देखभाल दुरूस्ती आगरकर प्रतिष्ठान करते. शुक्रवारी सकाळी हायस्कूलमधील कर्मचार्यास आगरकर यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला.

Loading...

मुख्याध्यापकांनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षांना कल्पना दिली. प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांना बोलावून घेण्यात आले. ही वार्ता गावभर पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ त्याठिकाणी दाखल झाले.घडलेल्या प्रकाराबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील