पाकिस्तानला नमवत भारताची अंतिम सामन्यात धडक..!

टीम महाराष्ट्र देशा: आज ख्राईस्टचर्च येथे झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या ऊपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा ऊडवत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. भारताचा कर्णधार पृथ्वी शाँ ने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.प्रथम फलंदाजी करत भारताने ९ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकात २७२ धावा करत पाकिस्तान समोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हांन दिले.

भारतीय सलामावीर पृथ्वी शाँ व मनजोत कालराने धडाकेबाज सुरूवात करत ८९ धावांची सलामी दिली.त्यानंतर पृथ्वी शाँ ४१ धावांवर धावबाद झाला तर कालराने ४७ धावांचे योगदान दिले.त्यानंतर फलंदाजीस आलेल्या शुभनम गिलने ९४ चेंडूत १०२ धावांची स्फोटक खेळी करत टिम इंडियाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली.

bagdure

२७३ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात अत्यंत खराब झाली.डावाच्या चौथ्या षटकात इशान पोरलने पाकिस्तानला पहिला धक्का देत नंतरच्या सहव्या,आठव्या व बाराव्या षटकात पुढचे तीन फलंदाज बाद करत पाकिस्तानची आघाडीची फळी मोडून काढली.

इशान पोरलने ६ षटकात १७ धावांच्या मोबदल्यात ४ गडी टिपले तर रियान पराग व शिवा सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद करत पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले.

या विजयाबरोबरच भारताने अतिंम सामन्यातले आपले स्थान पक्के केले.३ फेब्रुवारीला भारत विश्वविजेतेपदासाठी आँस्ट्रेलियाशी दोन हात करेल.

You might also like
Comments
Loading...