टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर आपण दररोज काही काही नवीन बघत असतो. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल व्हिडिओ चा समावेश असतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी आपल्याला फनी कंटेंट तर कधी आश्चर्यचकित कंटेंट बघायला मिळतो. तर कधी या व्हायरल व्हिडिओमध्ये प्राण्यांचे व्हिडिओ समाविष्ट असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एका प्राण्याचा हृदयस्पर्शीपणा बघायला मिळत आहे.
प्राणी असो किंवा मनुष्य आईची माया ही सर्वात वेगळी असते असे आपण नेहमी ऐकत असतो. असाच एक आईचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चाललेला प्रकार पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये चक्क एक माकड मादी कुत्र्यांच्या पिल्लाला दूध पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ वापरकर्त्यांची मन जिंकत असून या मादी माकडाने कुत्र्याचे पिल्लू दत्तक घेतल्याचे दिसत आहे.
मादी माकडाने पाजले कुत्र्याच्या पिलांना दूध
सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक अनोखा प्रकार बघायला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका इमारतीच्या पायऱ्यावर बसलेले मादी माकड शेजारी उभ्या असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना तिचे दूध पाजताना दिसत आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आजूबाजूला येऊन उभा राहत हे मनोहरी दृश्य पाहताना कॅमेरात कैद झाले आहेत.
पाहा व्हिडिओ
Viral Video | माकडाने पाजले कुत्र्याच्या पिलांना आपले दूध, पाहा व्हिडिओhttps://t.co/Om6iFBtc80
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 15, 2022
व्हायरल व्हिडिओ
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असलेला हा व्हिडिओ truesubham इंस्टाग्राम अकाउंट द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 23 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडिओला आत्तापर्यंत 3 लाख 15 हजारांपेक्षा जास्त युजर्सने लाईक केले आहे. लाईक्स बरोबरच या व्हिडिओवर वापर करताना कडून कमेंट्सचा देखील वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर एका वापर करताना कमेंट केली आहे, ” आईची जागा कुणी घेऊ शकत नाही”. तर दुसरा एक युजर कमेंट करत म्हणाला की, “माणूस माणुसकी विसरत चालला आहे पण प्राण्यांमध्ये अजूनही ती जिवंत आहे”.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटाच्या चिन्हावर देखील आक्षेप ; काय आहे प्रकरण?
- Breaking News । भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप, कारणही सांगितलं…
- Diwali 2022 | या वर्षी दिवाळी धनत्रयोदशी चा शुभ मुहूर्त कधी आहे, ते जाणून घ्या
- Historical moment | भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! सलग 7व्यांदा जिंकला आशिया कप
- Deepak Kesarkar | ‘50 खोके एकदम ओक्के’ म्हणून डिवचणाऱ्या ठाकरे गटावर दीपक केसरकरांचा हल्ला