HTC U11- एचटीसी यु ११ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल

एचटीसी यु ११ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल झाला, सफायर ब्ल्यू या रंगाची आवृत्ती सादर केली असून याची नोंदणी सुरू झाली आहे.

एचटीसी यु ११ हे मॉडेल ५१,९९० रुपयात तुम्हाला मिळणार आहे. कंपनीच्या ई-स्टोअरवरून याची नोंदणी करू शकता. यामध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी (११४० बाय २५६० पिक्सल्स) क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉम ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर, सहा जीबी रॅम तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबी इतके वाढवता येईल.

यातील रिअर कॅमेरा १२ अल्ट्रापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. यामध्ये थ्री-डी साऊंड प्रणाली देण्यात आली आहे.