HSC: बारावी परीक्षा निकाल उद्या; या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

HSC

पुणे: गेले अनेक दिवस राज्यातील  १२ वी च्या विद्यार्थ्यांसह पालक निकालाची वाट पाहत होते. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या १६ जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.  बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल.

निकाल पाहण्यासाठी खालील तीन पैकी कोणत्याही एका वेबसाईट चा वापर विद्यार्थ्यांनी करावा-

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (HSC) निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. निकालाची छापील प्रत मात्र कधी दिली जाईल याची माहिती अजून बोर्डाने दिलेली नाही .१२ वीची परीक्षा फेब्रुवारी- मार्च मध्ये पार पडली होती. मात्र, मार्च पासून कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे पेपर तपासणीसाठी विलंब लागला.

पुण्यात आता दररोज होणार ७ हजार कोरोना चाचण्या!

साधरणपणे, मे च्या शेवटच्या आठवड्यात लागणारा १२ वीचा निकाल यंदा २ महिने उशिरा लागत आहे. तर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी १२ वीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान तर १० वीचा (SSC)निकाल ३१ जुलैच्या आत लागेल अशी माहिती दिली होती. आज सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल देखील जाहीर झाला आहे.

अखेर ‘तो’ निर्णय रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला