बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 1 वाजता आँनलाईन दिसणार

टीम महाराष्ट्र देशा :  २८ मे उद्या मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल लागणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल आँनलाईन दिसणार आहे.

मे च्या पहिल्या आठवड्यातच बारावीच्या सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल जाहीर झाले होते. तर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या निकालाची प्रतीक्षा होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. सर्वांना निकालाची प्रतीक्षा होती आणि ती आता संपली आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. अशी माहिती राज्य मंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या वेबसाईटवर दुपारी 1 नंतर निकाल पाहता येणार : –

mahahsscboard.maharashtra.gov.in