fbpx

यंदा बारावीचा निकाल उशीरा…

std.5th & 8th sclorship exam on 18th feb,2018
       येत्या 28 फेब्रुवारीपासून 12 वी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र परीक्षा सुरु होण्याआधीच निकाल उशीरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यातल्या 72 हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीबाबत असहकार आंदोलन पुकारले आहे.
            3 मार्चपासून एक शिक्षक 12 वीचा केवळ एकच पेपर तपासणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने घेतली आहे. कायम विनाअनुदानित कॉलेजांचा प्रश्न आणि 2012-13 पासून रुजू झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्यावर्षी शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या. पण अद्याप त्याबाबत अंमलबजावणी झाली नसल्याने शिक्षकांनी आंदोनाची भूमिका घेतली आहे.