कडक उपाययोजना करूनही बारावीची प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवरवर व्हायरल

whats app

पुणे: बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवरवर व्हायरल झाल्याचा प्रकार घडला त्यामुळे राज्य मंडळाकडून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. तरी देखील या सर्व नियमांना न जुमानता प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट विद्यार्थ्यांच्या सहीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशीरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता.

यावर्षी पासून प्रत्येक वर्गातील पर्यवेक्षकांकडे २५ प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट देण्यात येणार. पर्यवेक्षकांनी हे सिलबंद पाकिट परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची सही घेऊन उघडायचे असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली तरीही प्रश्नपत्रिका पेपर सुरू होताच व्हॉट्स अॅपवरवर व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर यात सहभागी असलेले विद्यार्थी परीक्षा केंद्रात उशीराने आल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून उशीरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचाही निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचाही निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे.Loading…
Loading...