HSC- बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख अद्याप घोषित नाही

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख अद्याप घोषित केलेली नसतानाही सोशल मिडियावर अनधिकृतपणे तारखा घोषित करण्यात येत आहेत. या तारखांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेऊ नये, असं मडळाच्या वतीनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे. निकालाची अधिकृत तारीख ईमेल, प्रसिद्धी माध्यमे, वर्तमानपत्रे तसंच मंडळाच्या संकेतस्थळावरुन कळवण्यात येणार आहे.