बारावीचा पहिलाच पेपर फुटला…

टीम महाराष्ट्र देशा : आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाल्याअसून पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागल्याने शिक्षण विभागातील गोंध पुन्हा एकदा समोर आला आहे.जेमतेम तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली.

bagdure

एका खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. बार्शीतील वसंत ज्युनिअर कॉलेजमध्ये इंग्रजीच्या परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तासाभरात व्हॉट्सअॅपवर त्या प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हायरल झाला. तसेच त्याच्या उत्तर पत्रिका तयार करण्यात आल्या आणि त्या देखील व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.

सेक्शन ए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 252 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी इंग्रजीची प्रश्नपत्रिका थेट सोशल मीडियावर आली आहे.पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आल्यानंतरही असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...