महिला दिनी हृता दुर्गुळेची खास पोस्ट..! ‘अनन्या’ सिनेमाच्या पोस्टरने वेधले लक्ष..
मुंबई : संघर्षाची, कहाणी अन्यायाविरोधात आवाज पुकारणाऱ्या एका लढ्याची,कहाणी एका धाडसाची…’ हो. एका सत्य घटनेवरनं प्रेरित आहे अनन्या सिनेमाची कथा. हृता दुर्गुळे या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाचं पोस्टर आज अखेर जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रीलीज करण्यात आलं. हृता दुर्गुळेनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अनन्या’ सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सिनेमाची टॅगलाईन आणि फोटो हे सध्या लक्षवेधी ठरत आहेत.
https://www.instagram.com/tv/Ca1Mw5QgrAY/?utm_medium=copy_link
तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे” अशी सकारात्मक उर्जा देणारी टॅगलाईन सिनेमाची आहे. तर पोस्टरमध्ये हात नसलेली अनन्या पायानं तिचे केस विंचरतेय,ते ही चेहऱ्यावर सुंदरसं स्माइल ठेवून बरं का. हा सिनेमा १० जून,२०२२ रोजी सिनेमागृहात आपल्या भेटीस येत आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट,ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी प्रताप कड यांनी उचलली आहे.
सिनेमाचा विषय हा आधी नाट्यरुपात रंगमंचावर आला आहे. यामध्ये ऋतुजा बागवेनं ‘अनन्या’ ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या नाटकाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यात रंगमंचावर अपंग मुलीची व्यक्तिरेखा हुबेहूब साकारणाऱ्या ऋतुजा बागवेचं तिच्या अभिनयाबद्दल विशेष कौतूकही झालं होतं. त्यामुळे अर्थातच ‘अनन्या’ वर सिनेमा येतोय याविषयी लोकांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे. त्यात आता पोस्टरमध्ये हृता दुर्गुळेला पाहून सिनेमाची चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाविषयी मागे एका मुलाखतीत हृतानं म्हटलं होतं,”हा सिनेमा म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. आयुष्य सुंदर आहे, ते मनमुराद जगावं.
महत्वाच्या बातम्या :