Share

Hritik Roshan | गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसोबत ऋतिक रोशनचे सुट्टीचे फोटो व्हायरल

Hritik Roshan | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hritik Roshan) सध्या सबा आझादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. या गोष्टीमुळे अभिनेता प्रचंड चर्चेमध्ये आला आहे. कारण हृतिक आणि सबा कायम सोबत स्पॉट होताना दिसत आहे. अनेकांना यांची जोडी अजिबात आवडली नाही, तर काहींना जोडी आवडली आहे. नेटकऱ्यांकडून या दोघांवर वडील आणि मुलीची सुंदर जोडी अशा कमेंट्स केल्या जात आहे. सबा या टीकांना कायम सडेतोड उत्तर देत असते.

सध्या हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसह क्रिसमस साजरी करण्यासाठी युरोपमध्ये गेला आहे. त्याचे या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ऋतिक त्याच्या गर्लफ्रेंड आणि मुलांसोबत बर्फामध्ये पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत असताना ऋतिक रोशन त्याला कॅप्शन दिले आहे की,”मेरी क्रिसमस ब्यूटिफुल पिपल”.” मीडिया रिपोर्टनुसार हृतिक आणि कुटुंब स्विझलँडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

हृतिक रोशनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ऋतिक, सबा आणि मुलांसह त्याची चुलत बहीण पश्चिमा रोशन दिसत आहे. या फोटोजमध्ये हृतिकचा चुलत भाऊ ईशान रोशन देखील आहे. हृतिक रोशनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोवर चाहते कमेंट करत नाताळाच्या शुभेच्छा देत आहे.

हृतिक रोशनच्या या फोटोवर एक चाहता कमेंट करत म्हणाला आहे की,”मेरी क्रिसमस, खूप छान.” तर अजून एक चाहता या पोस्टवर कमेंट करत म्हणाला आहे की,”हा फोटो खूप क्यूट दिसत आहे, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नाताळच्या शुभेच्छा.” हृतिकच्या या पोस्टवर चाहते चांगल्या कमेंट करत आहे. तर नेटकरी या पोस्टवरून हृतिकला ट्रोल करत आहे.

महत्वाच्या बातम्या

Hritik Roshan | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hritik Roshan) सध्या सबा आझादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. या गोष्टीमुळे अभिनेता …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now