‘ऋतिक रोशनकडं अतिरिक्त बोट आहे, पण काड्या नेहमी मायकल वॉन करतो’

won vs jafar

मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन टीम इंडियाचा चाहता झाला आहे. मायकल वॉन नेहमीच आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यमुळे चर्चेत राहिला आहे. वॉननं नुकतीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली होती. या टीकेला माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरनं चोख प्रतिउत्तर दिलं आहे.

वॉननं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याच्या सोबत तुलना करत विराटवर निशाणा साधला आहे. वॉन म्हणाला होता कि, ‘विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला असता, पण विराट कोहली असेपर्यंत तो कधीही सर्वोत्तम खेळाडू ठरणार नाही, कारण तो भारतीय नाही,’ असं म्हणत त्याने कोहलीवर निशाणा साधला होता.

‘माझ्या मते विल्यमसन तीन्ही प्रकारात सर्वोत्तम आहे. पण तो विराट कोहलीची बरोबरी करु शकत नाही. कारण, त्याचे इन्स्टाग्रामवर 100 मिलिअन फॉलोअर्स नाहीत, त्याच्याकडं मोठ्या कंपनीच्या जाहिराती नाहीत. त्यामुळे तो जास्त कमाई करत नाही. सर्व जण विराटबद्दल चांगलं बोलतात. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतात. विल्यमसन ज्या पद्धतीनं खेळतो. मैदानावर त्याचं वर्तन शांत आणि संयमी असते. ही खरंच कमाल आहे.’ असं वॉनचं म्हणणं आहे.

त्यावर वॉनला जाफरने जबरदस्त प्रतिउत्तर दिल आहे. वासीम ट्विट करत म्हणाला, ‘ऋतिक रोशनकडं अतिरिक्त बोट आहे,.पण मग का मायकल वॉन करतो.’ या शब्दात जाफरनं वॉनला उत्तर दिलंय. जाफरचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP