श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक: नगराध्यक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा तर बहुमत भाजपकडे

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजप व कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनीता शिंदे यांचा पराभव करत कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे यांनी २ हजार १०० विजय मिळविला आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली होती. या निवडणुकीत भाजपाने ११ जागांवर विजय मिळविला तर आघाडीने 09 जागांवर विजय मिळविला.

नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी यांच्यात लढत होती. यामध्ये कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे यांनी विजय मिळवला.

सर्व विजयी उमेदवार –
प्रभाग क्रमांक १ -संगीता मखरे, राजूू लोखंडे (आघाडी)
प्रभाग क्रमांक २- सुनीता खेतमाळीस (भाजप), गणेश भोस (आघाडी)
प्रभाग क्रमांक ३- दीपाली औटी, संग्राम घोडके (भाजप)
प्रभाग क्रमांक ४- मनोहर पोटे (आघाडी), वनिता क्षीरसागर (भाजप)
प्रभाग क्रमांक ५- मनीषा वाळके, शहाजी खेतमाळीस (भाजप)
प्रभाग क्रमांक ६- अशोक खेंडके, मनीषा लांडे (भाजप)
प्रभाग क्रमांक ७ – सोनल घोडके, निसार बेपारी (आघाडी)
प्रभाग क्रमांक ८- ज्योती खेडकर, रमेश लाढाणे (भाजप)
प्रभाग क्रमांक ९- छाया गोरे (भाजप), सीमा गोरे, संतोष कोथिंबिरे (आघाडी)