मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. याचे कारण आता परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.
दरम्यान यावर आता भाजपने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीट करून अनिल परबांवर निशाना साधला आहे. ईडीने दिलेली नोटीस सुडबुध्दीने… मात्र ‘घ्या रे त्याला आत’ मात्र प्रेमाने ऐसा कैसा चलेगा अनिल?’ असा सवाल त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून विचारला आहे.
ED ने दिलेली नोटीस सुडबुध्दीने… मात्र
"घ्या रे त्याला आत" मात्र प्रेमाने
ऐसा कैसा चलेगा अनिल?— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) August 29, 2021
भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना अनिल परबांवर हल्लाबोल चढवला आहे. ‘ईडीला कायद्याने अधिकार दिला आहे. त्यांच्याकडे काही तक्रार असेल. सचिन वाझे प्रकरणात काही माहिती असेल त्यामुळे ईडी चौकशी करत असावी.
ईडी जर चौकशी करणार असेल आणि आपला काही दोष नसेल तर या देशात कुणाचंही सरकार असलं तरी सूडाचं राजकारण करता येत नाही हे आपण परवा पाहिलं आहे. परवा नारायण राणेंना अटक करण्याचा प्रयत्न केला. लगेच जामीन मिळाला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दोषी असो किंवा नसो राजकीय पक्षाचं विमा कवच घेण्याचं कारण नाही. राजकीय पक्ष म्हणजे काही सेक्युरीटी नाही. तुम्ही नेता आहात म्हणून तुम्ही काहीही कराल असा कायदा यांच्यासाठी दुर्देवाने देशाने केला नाही.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर
- मोठी बातमी ! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने धाडली नोटीस
- सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल- पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल
- भाजप परभणी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंच्या गाडीवर हल्ला, कारवाईची मागणी
- ‘माझ्या नावात पटेल; सगळ्यांना पटेल अशीच कामे मी करणार’, प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांची ग्वाही!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<