पाच फुटाच्या गाईला १५ फुटांचंं रेडकू कस होईल? – छगन भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रे निमित्त अनेक राष्ट्रवादी नेते आज गुहागर मध्ये आले होते. त्यावेळी व्यासपीठावरून संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. छगन भुजबळ यांनी यावेळी ‘पाच फुटांच्या गाईला 15 फुटांचं रेडकू कसं होईल ?’ असा उपहासात्मक प्रश्न भाजप सरकारला विचारला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या अटकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला काही व्यवहारात्मक प्रश्न विचारले.

जर 100 कोटींचं कंत्राट दिलं असेल तर 850 कोटी कसे काय खर्च होतील असा प्रश्न भुजबळांकडून यावेळी विचारण्यात आला, त्यावरूनच भुजबळांनी पाच फुटांच्या गाईला 15 फुटांचं रेडकू कसं होईल ? असा सवाल केला.

तसेच भुजबळ म्हणाले की , ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 25 हजार कोटी खाल्ले असं बोलतात. मग म्हणाले 10 हजार कोटी खाल्ले. आता म्हणतात 850 कोटी अरे कंत्राट फक्त 100 कोटींचं होतं. ज्याने महाराष्ट्र सदन बांधलं तो कोकणात जाऊन बसला आहे. ज्याने इतकी सुंदर इमारत बांधली त्याला एक रुपयादेखील दिला नाही. तो माणूस मला 850 कोटी रुपये कसा देईल ?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.

You might also like
Comments
Loading...