निर्णय झालेला नसतानाही व्हीप जारी झालाचं कसा ? पक्षप्रमुख घेणार शोध

udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला संसदेबाहेर देखील असंच काहीसं चित्र पहायला मिळत आहे. व्हीप जारी करण्यावरुन शिवसेनेत वाद सुरु झाला असून निर्णय झालेला नसतानाही व्हीप जारी कसा झाला याचा शोध पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून घेतला जात असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान,शिवसेनेचा व्हिप अस्तित्त्वातच नव्हता, कुणीतरी खोडसाळपणे खोटा व्हिप जारी केला असं म्हणत खासदार चंद्रकांत खैरे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून पक्षाच्या संसदीय मंडळाला भूमिका कळवली आहे. देशातील वातावरण, जनतेच्या तीव्र भावना आम्हाला माहीत आहेत. परंतु, अविश्वास प्रस्तावाचं नाटक, गोंधळ, गदारोळ, चर्चा या झमेल्यात आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे आम्ही तटस्थ राहणार आहोत, सभागृहात जाणार नाही, मतदान करणार नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहे.दरम्यान, अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

चर्चेसाठी कुणाला किती वेळ?

भाजप – 3 तास 33 मिनिटं

काँग्रेस – 38 मिनिटं

अण्णा द्रमुक – 29 मिनिटं

तृणमूल काँग्रेस – 27

शिवसेना- 14 मिनिटं

टीडीपी- 13 मिनिटं
तेलंगणा राष्ट्र समिती – 9 मिनिटं

२ ऑक्टोबर ला पेन्शन दिंडी निघणार

संसदेत अविश्वास ठराव : चर्चेसाठी सात तासांची वेळ राखीव