निपाह व्हायरस पसरण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय…

how-to-take-care-of-yourself-from-the-nipah-virus

वेब टीम- केरळमध्ये निपाह नावाच्या एका जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या पंधरा दिवसात निपाह व्हायरसची लागण झालेले तीन रुग्ण आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Loading...

केरळच्या कोळिकोड शहरात इन्फेक्शनची लागण झालेल्या अन्य 25 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका नर्सचाही मृत्यू झाला आहे.

निपाह व्हायरस काय आहे?

 • या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते. प्राणी आणि माणसांमध्ये हा गंभीर आजार जन्म घेतो.
 • हा व्हायरस वटवागुळात असतो.
 • १९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. तेच नाव या व्हायरसला देण्यात आले.
 • २००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या व्हायरसची लागण झाली.
 • सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशन (CDC)नुसार, निपाह व्हायरसचे इंफेक्शन एंसेफ्लाइटिसशी संबंधित आहे. त्यामुळे मेंदूचे नुकसान होते.

लक्षणं काय आहेत?

 • हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.
 • हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात.
 • लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.
 • अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले.
 • ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे 7-10 दिवस आढळतात.
 • सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे  तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.

काय काळजी घ्याल?

 • सध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही.
 • पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो.
 • संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा.
 • वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे.
 • मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा. तुम्हाला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.

Nipah virusLoading…


Loading…

Loading...