गुटखाबंदी असताना राज्यात गुटखा विक्री होतेच कशी?- मुंडे

dhananjay munde on gutkha

टीम महाराष्ट्र देशा- गुटखाबंदी असताना राज्यात गुटखा विक्री होतेच कशी? असा थेट सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज अधिवेशनात उपस्थित केला.परिमंडळ ५ मध्ये गुटखा उत्पादन, विक्री सर्वात जास्त आहे, याची चौकशी सीआयडी मार्फत करावी. विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले मुंडे  

गुटखाबंदी असताना राज्यात गुटखा विक्री होतेच कशी?परिमंडळ ५ मध्ये गुटखा उत्पादन, विक्री सर्वात जास्त आहे, याची चौकशी सीआयडी मार्फत करावी. विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
गुटखाबंदी करणा-या विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची घोषणा त्यावर सरकारने केली. या प्रकरणातील दोषी अधिका-यांची चौकशीही करण्यात येणार आहे.राज्यात महसुली उत्पन्नाचा विचार न करता जनतेच्या आरोग्याचा विचार करून बंदी घातलेली असताना गुटखा, पानमसाला याबरोबरच सुगंधित सुपारी, तसेच तंबाखू व खर्रा विकले जातात. याविषयी प्रभावी अशी कार्यवाही केली जात नाही.

https://twitter.com/dhananjay_munde/status/971290440099090437

गिरीश बापट यांचे सीआयडी चौकशी करण्याचे आश्वासन
मुंडे यांच्या मागणीवर अवैध गुटखाविक्रीवर कडक कारवाई करण्यासाठी दक्षता पथकामार्फत तपास करण्याचे व प्रसंगी सीआयडी चौकशी करण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले. तसेच गुटखा विक्री विरोधात अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करणार असेही सांगितले.