वाचा… कसा कराल मद्यपानाचा हँग ओव्हर कमी

मद्यपान हे शरीरास्ठी हानीकारक आहे. तरीही अनेक लोक पार्टीमध्ये मजा घेत मद्यपान करतात. मात्र मद्यपान करताना  जेवढी मजा घेतली जाते तेवढीच सजा दुसऱ्या दिवशी हँग ओव्हर मुळे भोगावी लागते. त्यामुळे हवीशी वाटणारी दारू दुसऱ्या दिवशी त्रासदायक ठरते. या त्रासाला घरगुती इलाजानेच आवर घालता येऊ शकतो.

कशा पद्धतीने कमी करता येतो हँग ओव्हर ?

जास्त मद्यपानामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते त्यामुळे डिहायड्रेशन चा सामना करावा लागतो. त्यामुळे डिहायड्रेशन झाल्यानंतर पाण्याचे सेवन करून शरीरातील पाण्याची मात्रा वाढवावी. हँग ओव्हर चा त्रास सुरु झाल्यावर चहा किंवा कॉफी चे सेवन नकरता लिंबू पाणी किंवा नारळ पाणी घ्यावे. कॉफी किंवा चहाच्या सेवनाने अजून त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉफी चे सेवन करणे शक्यतो टाळावे.

हँग ओव्हर मध्ये डोकेदुखीचा भयंकर त्रास होतो. त्यासाठी इलाज म्हणून केळी खाणे हा उत्तम इलाज ठरू शकतो. केळ हे शरीरातले कॅल्शियम वाढवण्यास मदत करते तसेच मॅग्नेशियमची देखील कमतरता भरून काढते. त्यामुळे पित्त होणे, मळमळणे , डोकेदुखी इ. तक्रारी दूर होतात.

हँग ओव्हर असताना उपाशी राहणे महागात ठरू शकते. कारण उपाशीपोटी अजून त्रास होण्याची संभव असतो. त्यामुळे हँग ओव्हर चा त्रास सुरू झाला की प्रथिने आणि कर्बोदके युक्त आहार घ्यावा.