VIDEO-कशी पुरविल्या जाते बारावीच्या विध्यार्थ्यांना कॉपी

सोलापूर: बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा प्रकार घडला त्यामुळे राज्य मंडळाकडून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. तरी देखील या सर्व नियमांना न जुमानता प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या तांबेवाडीमध्ये बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्यानंतर, त्याला पुष्टी देणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस समोर असताना थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन विद्यार्थी खिडक्यातून कॉपी टाकताना दिसत आहेत.

Loading...

बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पेपर सुरु होऊन एका तासातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळली आहे. मात्र गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी पेपरफुटीची घटना घडली नसल्याचा दावा केला आहे. तसा त्यांनी अहवाल सुद्धा साधार केला आहे. मात्र या घटनेला पुष्टी देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. पेपरफुटीची घटना दाबण्याच्या प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे.

पेपरफुटी प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. दशरथ सोनावणे या तरुणाला शिकाशिकाणी दमबाजी करत राका राजकीय पक्षाचा झेंडा असलेल्या गाडीतून त्याचं अपहरण केल्याच्या चर्चेला उधान आलं आहे. दुसरीकडे ही घटना उघड झाल्यानंतरही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यामध्ये अधिकारी वर्गाचा हस्तक्षेप असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई