वाचा शेतकऱ्यांना कसे मिळणार सहा हजार !

टीम महाराष्ट्र देशा – शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची सरकारची घोषणा आहे तीन भागात रक्कम दिली जाणार. पहिली लोकसभा निवडणुकीदरम्यान देणार, दुसरी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देणार, तिसरी देणार की नाही ते माहिती नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या दौंड येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होत्या.

Loading...

यावेळी सुळे म्हणाल्या की, सरकार म्हणतंय की हमीभाव दिला पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही, हे सरकार मांडतं एक आणि करतं एक हा ‘जुमलो’ का बजेट आहे.

रोजगार हमी योजनेत काम केले तरी महिन्याला जवळपास ८ हजार रुपये मिळणार पण हे सरकार ६ हजार देत आहे. पण जरा आणखी शुन्य यात वाढवले असते तर बरे झाले असते. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची सरकारची घोषणा आहे तीन भागात रक्कम दिली जाणार. पहिली लोकसभा निवडणुकीदरम्यान देणार, दुसरी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देणार, तिसरी देणार की नाही ते माहिती नाही, असही सुप्रिया सुळे म्हणाल्या.Loading…


Loading…

Loading...