fbpx

लठ्ठपणा कसा रोखावा नियंत्रण

Obesity scintefic treatment

‘लठ्ठपणा’ म्हणजे नेमके काय? एखादा दुर्धर आजार की अजुन दुसरे काही? लठ्ठपणाला जर आजार समजले तर माणुस शारिरीकदृष्ट्या (Physically) तर व्याधिग्रस्त होतोच पण मानसिकदृष्ट्या( Mentally) सुद्धा Depression मध्ये जाऊ शकतो ,आणि जेव्हा आपण स्वत:ला आजारी मानायला लागतो तेव्हाच खरा आजार सुरु होतो किंवा गतीशिल होतो असे मानायला हरकत नाही, आणि म्हणुन प्रथम तर ही गोष्ट मनातुन काढुन टाकावी की लठ्ठपणा किंवा वजन वाढणे म्हनजे एखादा बरा न होणारा आजार आहे व यातुन आपली मुक्तता होणारच नाही!!  पण हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करुन देखिल चालणार नाही,  हा आजार जरी नसला तरी आजाराला आमंत्रण( Invitation )मात्र नक्कीच आहे!

लठ्ठपणा कारणे: लठ्ठपणाची अनेक कारणे असु शकतात यामध्ये प्रामुख्याने Over Eating ( मेदयुक्त), व्यायामाचा अभाव, Sedentary Habits( तथाकथित एषोआरामी जीवन) ,चयापचयाशी संबंधित आजार( Metabolic disorders), मानसिक तनाव, medicines इ.

लठ्ठपणा व संबंधित समस्या:  जसे की वर म्हटल्याप्रमाणे लठ्ठपणा म्हनजे अनेक प्रकारच्या आजारांना Open Invitation च , यामुळे मधुमेह, हृदयरोग,ऊच्चरक्तदाब, किडनीचे रोग, नपुंसकत्व, व्हेरिकोज व्हेन , औदासिन्य, चिडचीड, शारिरीक शिथीलता , सौंदर्याशी संबंधित अडचणी इ.आणि या सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणुन वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करणे कधीही धोक्याचेच!

ऊपाययोजना: आजकाल लठ्ठपणा वर खात्रीशीर ऊपाय ही एक ज्वलंत समस्या निर्माण झालेली आहे, वाढत्या बाजारीकरणामुळे  वेगवेगळ्या पावडर्स, यंत्र- तंत्र , औषधी,यांच्या जाहिरातबाजीतुन रुग्णांची लुट चाललेली आहे, ७ दिवसात वजन घटवा, १ महिन्यात वजन घटवा, स्लिम ट्रिम बना या सारख्या अमिषांना रुग्ण बळी पडतात व शेवटी नैराश्याच्या गर्तेत अडकतात.

अशा लोकांनी प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की वर्षानुवर्षे वाढत आलेली चरबी काही आठवडा भरामध्ये कमी होणे शक्य नाही किंवा तसे झालेच तरी ते काही नैसर्गिक असणार नाही, त्याचे Side Effects नक्की होणार. म्हणुन वजन घटवत असतांना फक्त कुठल्याही एका औषधावर किंवा जिम जॉईन करण्यावर अवलंबुन राहिले जाऊ शकत नाही तर त्यासाठी खालील प्रमाणे सर्वंकष अभ्यासातुन पुढे आलेली ‘त्रिसुत्री’ (Triple Formula ) पद्धतीने ऊपचार करवुन घेतला तर अधिक लाभदायक सिद्ध होईल.

त्रिसुत्री (Triple Formula )

१) आहारनियंत्रण: सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आहारनियंत्रन ,पण याचा अर्थ उपासमार करवुन असा कधिच नव्हे, आहारातील नेमके कुठले घटक कमी करावेत, कुठले वाढवावेत ,आहारारचे कडक शिस्तबद्ध वेळापत्रक ( प्रत्येकाचे वेगवेगळे असु शकते) आहार तज्ञाच्या (Dietician) च्या सल्ल्यानुसारच पाळले जावे

२)योगासने: वाढलेली चरबी कमी करत असताने Heavy Exercise मुळे ती कमी तर होईल पण शरीर अजुन बेढब होऊन त्वचेवर सुरकुत्या पडु शकतात म्हणुन यासाठी योगासने अधिक शास्रशुद्ध( Scientific) सिद्ध होतात, व सोबतच योगामुळे मन:शांती प्राप्त झाल्यामुळे Depressionसारख्या गोष्टी आपोआप कमी होतात व चेहर्यावर प्रसन्नता येते. यामध्ये सुर्यनमस्कार ( Sun Salutations) हा सर्वात सोपा व प्रारंभीक योग प्रकार मानायला हरकत नाही! तरीही तज्ञांचे मार्गदर्शन कधीही फायद्याचेच!

३)औषधी ( होमियोपॅथिक): औषौधोपचाराने वजन घटण्याची प्रक्रिया अधिक जलद व खात्रीशिर होते, यामध्येही होमियोपॅथिक औषौधोपचाराने आपली ऊपयुक्तता सिद्ध केलेली आहे. जेव्हा आपण म्हणत असतो शरिराची प्रकृतीच वजन वाढण्याची आहे त्यामुळे काहीही केले तरी वजन कमी होऊ शकत नाही अशा वेळेस ही शारिरीक प्रकृती ( Diathesis) बदलवण्याची क्षमता फक्त होमियोपॅथिक औषधींमध्ये असते हे वारंवार सिद्ध झाले आहे.

अशाप्रकारे त्रिसुत्री वापरुन वजन कमी करणे हा नैसर्गिक व अधिक कायमस्वरुपी ऊपाय आहे! माहिती ऊपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करावी.

धन्यवाद!

लेखक

डॉ.रामेश्वर पाटील, MD (Hom)

संपर्क: 9665599110

(महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही)