उद्या लाँच होणार जिओचा १५०० रुपयांचा फोन;अशी करा फोनची बुकिंग

jio-phone-has-no-whatsapp-support

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ज्या फोनची घोषणा केली तो रिलायन्स जिओचा बहुचर्चित जिओ फीचर फोन 15 ऑगस्टला म्हणजेच उद्या लाँच होणार आहे. हा फोन 1500 रुपये तीन वर्षांसाठी अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येणार आहे. हे 1500 रुपये ग्राहकांना तीन वर्षांनी परत मिळतील.

ज्या ग्राहकांना बीटा टेस्टर होता आलं नाही, त्यांना 24 ऑगस्टपासून फोनसाठी बुकिंग करता येईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही प्रकारे तुम्ही फोन बूक करु शकता. बुकिंग झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये या फोनची डिलीव्हरी केली जाईल. 15 ऑगस्टला हा फोन लाँच होणार म्हणजे बीटा टेस्टिंग होणार आहे. काही निवडक ग्राहकांनाच हा फोन 15 ऑगस्टला वापरता येईल.

असा करा जिओ फोन बुक

जिओ फोन 24 ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता. या फोनची किंमत शून्य रुपये असली तरी 1500 रुपये अनामत रक्कम तुम्हाला द्यावी लागणार आहे. जी तीन वर्षांनी परत मिळेल.

हे आहेत जिओ फोनचे  खास फीचर्स

फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. 2000mAh क्षमतेची बॅटरी आणि 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.ड्युअल सिम स्लॉट, जिओ फोन घेतल्यानंतर ग्राहकांना महिन्याला केवळ 153 रुपये मोजावे लागतील. यामध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड 4Gडेटा मिळेल. 512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.एका दिवसात हायस्पीड डेटा वापरण्याची मर्यादा दिलेली असेल, या मर्यादेनंतर स्पीड कमी होईल.