fbpx

आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं- शरद पवार

Sharad-Pawar

सोलापूर : ‘माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात’ असा अजब दावा केल्यानंतर संभाजी भिडेंवर टीका होत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. के. एन. भिसे महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. पवार यांच्या हस्ते झाला. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भिडेंवर टीका केली.

शरद पवार म्हणाले, एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे. मी कृषीमंत्री असताना फळबागा लावा, आंब्याची झाडे लावा असे म्हणत होतो. आता आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं, त्यामुळे अश्या महाराजांकडे लोकांनी लक्ष देऊ नये.

काय म्हणाले होते संभाजी भिडे ?

लग्न होऊन 10 – 15 वर्ष झालेल्यांनाही पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.